खापरखेडा :- पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत येणाऱ्या ०५ कि.मी. अंतरावर मौजा दहेगाव येथे दिनांक १८/०८/२०२३ चे १९.१० वा. ते १९.५० वा. दरम्यान पोलीस स्टेशन खापरखेडा येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की, मौजा दहेगाव येथे ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीस स्टेशन खापरखेडा नागपूर ग्रामीण येथील स्टाफने घटनास्थळी जावुन वाहन थांबवुन चेक केले असता आरोपी नामे- संदिप रामराव पांडे, वय ३६ वर्ष, रा. दहेगाव रंगारी सावनेर त्याचे ट्रॅक्टर क्र. एम एच ४० ए १००७ नी त्या मागील डाला क्र. एम एच ३१ / झेड १६८८ नी अवैध्यरीत्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करतांना मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून लाल रंगाचा महेंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र. एम. एच. ४०/- १००७. किमती अंदाजे १५०,०००/- रु. तसेच ट्रॅक्टरच्या मागील लाल रंगाचा डाला क्र. एम एच ३१ झेड १६८८, किंमती १,००,०००/- रुपये मध्ये अंदाजे १ ग्रास रेती किंमती ४,०००/- रुपये असा एकूण २,५८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोलीस हवालदार शैलेश यादव पोस्टे खापरखेडा यांचे रीपोर्ट वरून पोलीस स्टेशन खापरखेडा येथे आरोपीविरूद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नायक मुकेश वापाडे पोस्टे खापरखेडा हे करीत आहे.