नागपूर :- दिनांक ०५.०२.२०२५ रोजी नागपूर शहर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ०७केसेस तसेच, एन.डी.पी.एस कायद्यान्वये ०१ केस असे एकुण ०८ केसेसमध्ये एकुण ०८ ईसमावर कारवाई करून रू. ३९,५०० या मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये ०३ केसमध्ये ०८ ईसमावर कारवाई करून रू. ७२.६४८/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वाहतुक शाखा पोलीसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकुण ३,९४२ वाहन चालकांवर कारवाई करून एकूण रू. ३,६२,२००/- रू. तडजोड शुल्क वसूल केले आहे.
वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलीसांतर्फे राबविण्यात आल्या असून या पुढेही प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांनी वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळुन वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.