मौजा गोंडखैरी येथील अवैध देशी दारू अड्डयावर धाड, स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिण ची कारवाई 

नागपूर :- दिनांक ११/०४/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावनेर उपविभागात गस्त करीत असतांना पोलीस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील मौजा गोंडखैरी येथे काका सावजी धाब्यावर विनोद कृष्णराव पोहनकर नावाचा इसम हा त्याचे धाब्यावर अवैधरित्या विनापरवाना देशी दारू वाळगुन विक्री करीत असल्याची गोपनिय माहीती पथकास प्राप्त झाले वरून सदर पथकाने सापळा रचुन छापा टाकला असता आरोपी नामे विनोद कृष्णराव पोहनकर, वय ५३ वर्ष, रा. श्रीकृष्ण नगर दत्तवाडी जि. नागपूर याचे ताब्यात १८० एम.एल च्या एकुण ५६ नम देशी दारूच्या निपा, एकुण किमती ३९२०/- रूपयाचा मुद्देमाल अवैधरित्या विनापरवाना मिळुन आल्याने सदर मुद्देमाल त्याचे ताब्यातून जप्त करून आरोपी विरूध्द अप क्र. २५४/२३ कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलीस ठाणे कळमेश्वर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस ठाणे कळमेश्वर करीत आहे.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस हवालदार निलेश वर्वे, दिनेश अधापुरे यांचे पथकाने केली..

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी नागपूरच्या रोजगार मेळाव्याला केले संबोधित, नागपुरात 210 जणांना शासकीय सेवेचे नियुक्तीपत्र वितरण

Thu Apr 13 , 2023
नागपूर :-केंद्र शासनाच्या सेवेत नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांनी आपले ज्ञान वाढवण्यासाठी सतत अभ्यास, नवीन तंत्रज्ञानाचा वापर ,आपल्या अभ्यासाचा जीवनात तसेच समाजासाठी उपयोग , हार्ड वर्क सोबतच स्मार्ट वर्क त्याचप्रमाणे आरोग्याची काळजी या पाच सूत्रीवर लक्ष देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी आज नागपूर मध्ये केले . मध्य रेल्वेच्या अजनी येथील रेल्वे सामुदायिक सभागृहात आज रोजगार मेळा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com