बु‌ट्टीबोरी येथे अवैधरित्या मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कारवाई

नागपूर :-दि. ३०/०९/२०२४ रोजी पोलीस ठाणे बोरी हद्दीतील मौजा धवलपेठ येथील पारधी बेडा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून आजूबाजूचे परीसरात विक्री करणार असल्याची गोपनीय खबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने पोस्टे बोरी हद्दीतील मौजा धवलपेठ येथील पारधी वेडा येथे सुरू असलेल्या अवैधरीत्या गावठी पद्धतीने हातभ‌ट्टी लावुन मोहाफुल गावठी दारू गाळणाऱ्या एकूण ३ इसमांवर कार्यवाही करण्यात आली. अवैधरित्या गावठी पद्धतीने हातभट्टी लावून मोहाफूल गावठी दारू गाळणारे आरोपी १) प्रकाश उजा काळे २) देवा कन्हैयागिरी चव्हान रा आसोला व १ महिला आरोपी यांचे ताब्यातून मोहाफुल गवठी दारू १०० लिटर एकूण किंमती ५०००/- चा तसेच ८ प्लास्टीक ड्रम मध्ये मोहाफुल उकडता रासायनिक सडवा २०० लीटर किंमती ३२०००/-रु तसेच मोहाफूल दारू काढण्याचे इतर साहित्य ड्रम, लाकूड इत्यादी मिळून किमती ७०००/- रु असा एकुण ४४०००/-रू चे मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. जप्त मुद्देमाल व कागदपत्र पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे बु‌ट्टीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले. आरोपी क २ चे ताब्यातुन प्लास्टीक इवकीतुन ५० लीटर मोहाफूल गावठी दारू कि २५००/-रू ६ प्लॉस्टीक इममध्ये १२०० लीटर मोहाफूल दारू सडवा किमत २४०००/-रू व दारू गाळण्याचे इतर साहीत्य ५०००/-रू असा एकुण ३१५००/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महीला आरोपी यांचे ताब्यातुन ७ प्लॉस्टीक डवकीमध्ये ७० लीटर मोहाफुल गावठी दारू कि ३५००/-रू तसेच १२ प्लॉस्टीक व लोखंडी इम मध्ये २०० लीटर मोहाफुल रासायनिक सडवा किमती ४८०००/-रू इतर दारू गाळण्याचे साहीत्य कि ८०००/- असा एकुण ५९,७००/- रू वा माल जप्त करण्यात आला, तिनही कारवाई दरम्यान एकुण १३५२००/-रू चा मूद्देमाल जप्त करून नाश करण्यात आला. नमुद ३ आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बोरी येथे कलम ६५ (बी), (सी), (ई), (फ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि मनोज गदादे, जिवन राजगुरू, सफी मिलिंद नांदुरकर, विनोद काळे, पोहवा संजय बांते, चापोहवा मुकेश शुक्ला, यापोशी आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैधरित्या रेतीची चोरी करण्याचा प्रयत्न करणा-या आरोपीताविरूध्द गुन्हा नोंद

Thu Oct 3 , 2024
– नागपुर ग्रामीण खापा पोलीसांची कारवाई खापा :- खापा पोलीस हददीत पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, मौजा चारगाव जवळ राजस्व विभागाच्या अत्यारित असलेल्या खैरी नाल्या जवळा काही इसम अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतुक करत आहे. अश्या मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस पंचासह जात असतांना सिरोजी ते बडेगाव प्रजीमा या कच्च्या रोडवर एक ट्रॅक्टर ट्रॉली सह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com