कन्हान :-दिनांक ०३/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कन्हान उपविभागातील पो.स्टे. खापरखेडा हद्दीत पेट्रोलींग करीत असताना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, एक ट्रकमध्ये अवैधरीत्या रेती (गौणखनिज) ची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी करीत असतांना खापरखेडा ते दहेगाव रंगारीकडे जाणाच्या रोडवरील सबल नाला जवळ एक पांढऱ्या रंगाचे १० चक्का ट्रक येतांना दिसले. सदर ट्रकची पाहणी केली असता टाटा कंपनीचा १० चक्का ट्रक क्रमांक एम एच ४० / सी.डी.- ५९०३ चे डाल्यामध्ये रेती गौणखनीज भरून दिसुन आली. ट्रक चालकास ताब्यात घेउन त्यास त्याचे नाव गाव व ट्रक मालकाचे नाव गाव विचारले असता ट्रक चालकाने आपले नाव दिनेश श्यामराव उपवंशी, वय १९ वर्ष रा. वंजारी भवन कोराडी असून ट्रक मालकाचे नाव संजय रघुवंशी, रा. वंजारी भवन कोराडी असे सांगीतले. ट्रक चालकास ट्रकचे कागदपत्र व रेती (गौणखनिज) वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) विचारले असता त्याने ट्रक से कागदपत्र व रेती (गौणखनिज वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सागीतले तसेच ट्रक मालक संजय रघुवंशी रा. वंजारी भवन कोराडी यांचे सांगणे वरुन तामसवाडी रेतीघाट मधुन मजुराचे हाताने ट्रक मध्ये रेती भरून दहेगाव रंगारी कडे घेउन जात असल्याचे सांगीतले. सदर ट्रक मधील रेती (गौणखनीज) तामसवाडी रेती घाट मथुन चोरुन आणल्याने सरकारी मालमत्तेची चोरी केल्याचे दिसुन आल्याने आरोपीच्या ताब्यातून १) टाटा कंपनीचा १० सक्का ट्रक क्रमांक एम एच ४० सी.डी. ५९०३ किंमती अंदाजे १०,००,००० /- रु तसेच ट्रकचे डाल्यात ०५ बास रेती किंमती २०,०००/-रु असा एकुण वाहनासह १०,२०,००० /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोहता राजेंद्र रेवतकर स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांचे रपोर्टवरून पोलीस स्टेशन खापरखेडा येथे ट्रक चालक व मालक यांचेविरुद्ध कलम ३७९, १०९ भादवि. अन्वये गुन्हा नोंद केला असून आरोपीला जात मुद्देमालासह पुढील कारवाई करीता पोस्टे खापरखेडा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोस्टे खापरखेडा हे करीत आहे.
सदरची कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोहार (भा.पो.से), अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस हवालदार राजेंद्र रेवतकर, आशिष मुंगळे, किशोर वानखेडे, आशिष भुरे, पोलीस नायक विरेंद्र नरड, पोलीस अंमलदार निलेश गुलकर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.