नागपूर :- यशोधरानगर पोलीसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असता, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, पोलीस ठाणे हद्दीत असरफ नगर, अन्सारी यांचे परी किरायाने, यशोधरानगर येथे राहणारा आरोपी नामे सागीर इसरार अन्सारी, वय ४९ वर्षे, याचे मरी रेड कार्यवाही केली असता, तो स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता शासनाने प्रतीबंधीत केलेला नायलॉन मांजा एकुण ५१ चकी विकी करण्याचे उद्देशाने जवळ बाळगुन समक्ष मिळुन आला. त्याचे ताब्यातुन शासनाने प्रतीबंधीत नायलॉन मांजाच्या ५१ चकी एकुण किमती अंदाजे २५,५००/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पो. ठाणे यशोधरानगर येथे आरोपीविरूध्द सहकलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी निकेतन कदम, पोलीस उप आयुक्त (परि. क. ५), विशाल क्षिरसागर सहा. पोलीस आयुक्त (जरीपटका विभाग) यांचे मार्गदर्शानाखाली, वयोनि रमेश खुने, दुपोनि सुहास राऊत, पोउपनि रविकुमार सावतकर, पोअं सन्नी मतेल, रोहीत रामटेके व राहुल शेट्टी यांनी केली.