अवैधरित्या जुगार खेळणा-या आरोपीवर कारवाई, ६ आरोपी व ६ मोटर सायकलसह एकूण ४,७७,८९०/-रू चा मुद्देमाल जप्त

नागपूर :- पोलीस स्टेशन मौदा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, टेपसना शिवार ता. कामठी येथील पडीत शेत शिवारात काही लोक ५२ तासपत्तयावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. यावरून त्वरीत पोलीस स्टेशन मौदा येथील अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मार्फतीने जुगार रेड केला असता जुगार खेळणारे आरोपी नामे १) नविन संतोष वाकले वय ३५ वर्ष रा. शुकवारी तेलीपुरा, नागपुर २) खुशाल रामभाउ कोल्हे वय ५१ वर्ष रा. सक्करदरा रोड, हनुमान मंदीरजवळ भाजीमंडी, नागपुर ३) प्रकाश केशव चाहदि वय ३५ वर्ष रा चिचाळा ता भिवापुर नागपुर ४) तुळशीराम लक्ष्मण कावरे वय ३९ वर्ष रा जुनी शुक्रवारी नागपुर ५) राजेंन्द्र सुर्यभान वाघुलकर वय ४८ वर्ष रा जुना बगडगंज नागपुर ६) विशाल वसंतराव लोणारे वय २९ वर्ष रा जुनी मंगळवारी, भांडेवाडी नागपूर हे ५२ तासपत्त्यावर जुगार खेळतांना मिळुन आले. त्याचे ताब्यातुन नगदी १७,८९०/- रू व वेगवेगळ्या कंपनीचे ६ मोबाईल किमती ६५०००/-रू तसेच घटनास्थळी ६ मोटर सायकल १) होंडा कंपनीची डिओ मोपेड क एम एच ४० बीडबल्यु ५८१३ किमती ५०,०००/- रू २) टीवीएस ज्युपीटर मोपेड क एम एच ४० सीएच ४८१० किमती ५५०००/- ३) बजाज एव्हेंजर मो.सा क एम एच ४९ एसी ३६९० किमती ७०,०००/- रू ४) टीवीएस ईलेक्ट्रॉनिक मोपेड क एम एच ४९ सीए ०११७ किमती ५५,०००/- ५) याम्हा एफ झेड मोटर सायकल क एम एच ३१ एफ के ०८९७ किमती ९०,०००/- रु ६) बजाज पल्सर मोटर सायकल क एम एच ४० बीडी ०३७९ किमती ७५०००/- रू असे वाहन एकुण किमती ३.९५,०००/- रू असा एकुण ४,७७,८९०/- रू चा माल मिळुन आल्याने आरोपीतांविरूध्द कलम १२ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वयें गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार (भापोसे), रमेश धुमाळ, अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण, संतोष गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग, यांचे मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, यांचे सोबत पोलीस स्टॉफ सपोनि मनोज चौधरी, पोलीस उपनिरीक्षक श्री महेश बोधले, पोहवा संदीप कडु संदीप कडु, गणेश मुदमाळी, रूपेश महादुले, प्रकाश गाठे, राजु आंधळे, राजेंन्द्र गौतम, पोना दिपक दरोडे, नितीन सार्वे, आषिश निपाने यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पो.स्टे. पारशिवनी हद्दीतील ग्रामीण रुग्णालय जवळून मोटर सायकल चोरी करणारे दोन आरोपी तसेच पो.स्टे. कळमेश्वर हद्दीतून अक्टीव्हा मोपेड चोरी करणारे दोन इतर आरोपींना पारशिवनी पोलिसांनी पकडले...

Thu Oct 3 , 2024
पारशिवनी :- येथे आठवडी बाजार असल्याने फिर्यादी नामे संजय परसराम दुनेदार वय ३६ वर्ष रा. बाबुळवाडा ता. पारशिवनी यांनी त्यांची Discover-150 मोटर सायकल क्र.MH-40-AL-5326 किं. अंदाजे ३५,०००/- रु ही ग्रमीण रुग्णालय पारशिवनी जवळ ठेवून बाजार करायला गेले व काही वेळाने बाजार करून परत आले असता त्यांना त्यांनी ठेवलेल्या ठिकाणी त्यांची Discover-150 मोटर सायकल दिसून आली नाही. परिसरातील लोकांकडून माहिती घेतल्यावर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com