सिल्लोड तालुक्यातील साखळी बंधारा प्रकल्पाच्या पुनर्रचनेसंदर्भातील कार्यवाही तातडीने करावी – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई :- सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावाच्या परिसरातील पाणी टंचाई परिस्थिती दूर करण्यासाठी व या भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष दुरूस्ती व विस्तार योजनेअंतर्गत पुलवजा बंधारा प्रकल्पच्या पुनर्रचनेसंदर्भातील कार्यवाही तातडीने करावी. तापी खोरे विकास महामंडळामार्फत या प्रकल्पाचा समावेश एकात्मिक राज्य जल आराखड्यात करण्यासाठीच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश अल्पसंख्याक मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गतची कामे तसेच सिल्लोड- सोयगाव भागातील विकास कामांचा आढावा मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज मंत्रालयात घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे कार्याकरी संचालक संतोष तिमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, उपसचिव प्रविण कोल्हे, आदिसह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सत्तार म्हणाले की, या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी साखळी बंधारा प्रकल्पाची पुनर्रचना गतीने होणे गरजेचे आहे. तसेच सोयगाव तालुक्यातील सोयगाव लघु पाटबंधारे प्रकल्पातून कालव्यामधून बंद नलिकेद्वारे जंगला तांडा लघु पाटबंधारे प्रकल्पात अतिरिक्त पाणी सोडण्याच्या कामासाठीची निविदा काढण्यात यावी. खेळणा मध्यम प्रकल्पाची गोडबोले दरवाजे बसवून उंची वाढवणे, पूर्णा नदीवरील साखळी बंधारे प्रकल्पास स्वनिधी अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात कार्यवाही करावी. चारूतांडा प्रकल्पांतर्गत पूल बांधकाम करण्यासंदर्भातील निविदा तातडीने काढण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री सत्तार यांनी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी १४ आगस्टपर्यंत मुदतवाढ

Wed Aug 7 , 2024
मुंबई :- सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा” चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर १४ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!