मुरूम चोरी करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई

कुही :- अंतर्गत २६ कि.मी. अंतरावर मौजा हळगाव फाटा येथे दिनांक १७/०७/२०२३ ०२.३० वा. दरम्यान पोलीस स्टेशन कुही येथील स्टाफ यांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, मौजा हळगाव फाटा येथे अवैधरित्या टिप्परच्या साहाय्याने मुरूमची चोरी होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त बातमीवरून पोलीस स्टेशन कुही येथील स्टाफने घटनास्थळी जावुन आरोपी चालक नामे- राजु कृष्णा केवट, वय ३२ वर्ष, रा. उंद्री, ता. उमरेड हा त्याचे ताब्यातील वाहन टिप्पर क्र. एम. एच. ४९ वी. झेड. १७५५ किंमती अंदाजे २०,००,०००/- रू मध्ये ०५ बास गौण खनिज मुरूम किंमती अंदाजे ६०० /- रू. ग्रास प्रमाणे ३०००/-रु. मुद्देमाल विना रॉयल्टी वाहतुक करून चोरी करून नेतांना मिळुन आल्याने आरोपीच्या ताब्यातून एकुण वाहनासह असा २००३००० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणी कुही पोलीसांनी, पो.स्टे. कुही येथे आरोपीविरुद्ध कलम ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार व नं. ४८५ प्रमोद बन्सोड हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राकेश अचल को 2023 का लोकजतन सम्मान, कुर्बान अली देंगे शैली स्मृति व्याख्यान

Wed Jul 19 , 2023
भोपाल :- इस वर्ष 2023 के लोकजतन सम्मान से वरिष्ठ पत्रकार, कवि, लेखक, विचार और मैदान दोनों मोर्चों पर सन्नद्ध राकेश अचल को अभिनंदित किया जाएगा। सोमवार, 24 जुलाई 2023 की शाम 5 से 7 बजे के बीच मानस भवन, फूलबाग, ग्वालियर में इस सम्मान समारोह का आयोजन होगा। इसी समारोह में इस वर्ष के शैलेन्द्र शैली स्मृति व्याख्यान की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com