अवैध रेतीची (गौणखनिज) चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध कारवाई.

– दिनेश दमाहे

वाहनासह एकूण ४०,५४०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची धडक कारवाई

नागपूर/उमरेड – स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ०३/०५/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. सुमारास उमरेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन उमरेड हद्दीत बायपास चौक उमरेड रोड येथे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक टिप्पर वाहनाने होत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून बायपास चौक उमरेड रोड येथे सापळा रचुन टिप्पर क्र. १) एम. एच-४९ ए.टी.- ७२२२२) एम एच ४९ ए. टी.-९२६६ चे चालकांनी विना परवाना (रॉयल्टी) आपल्या ताब्यातील टिप्परमध्ये (गौणखनिज) रेती भरून रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने दोन्ही टिप्पर एकुण किमती अंदाजे ४०,००,०००/- रू. मध्ये व दोन्ही टिप्पर मधील एकुण ०९ ब्रास रेती किमती अंदाजे ५४०००/- रूपयाचा मुद्देमाल असा एकुण ४०,५४,०००/- रूपयाचा मिळुन आल्याने पोलीस स्टेशन उमरेड येथे टिप्पर चालक आरोपी क्र. १) असीन खान वल्द अब्बास खान, वय २५ वर्ष, रा. गरीब नवाज चौक खरबी नागपूर २) संदीप राजेश गुप्ता वय २६ वर्ष, रा. सेनापती नगर प्लॉट क्र. ३८ दिघोरी उमरेड रोड नागपूर सदर दोन्ही वाहन चालक / मालक यांचेविरूद्ध तहसिलदार तहसिल कार्यालय उमरेड यांचे कडुन दंडात्मक कारवाई करवुन घेणेकरीता पोलीस स्टेशन उमरेड येथे डिटेन करण्यात आले असुन  तहसिलदार उमरेड यांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

सदर कारवाई विशाल आनंद पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण,  डॉ. संदिप पखाले अपर पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  ओमप्रकाश कोकाटे, पोलीस हवालदार अरविंद भगत, पोलीस नायक बालाजी साखरे, अजीज शेख, मयुर ढेकळे, रोहन डाखोरे यांचे पथकाने पार पाडली…

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यात आज 3 मे पासून शासकीय योजनांची जत्रा उपक्रमाचा शुभारंभ

Wed May 3 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -3 मे ते 2 जून पर्यंत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाचा लाभ घ्यावा-आमदार टेकचंद सावरकर  कामठी :- शासकीय योजना ही लोकाभिमुख आहे तिला गतिमान करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी या ‘शासकीय योजनेची जत्रा’अभियानाचा पुरेपूर फायदा घ्यावा.शासकीय योजनेची जत्रा ही योजना सर्वसामान्य नागरिकासाठी विकासाची नांदी ठरली आहे.शासकीय योजनांची जत्रा या अभियानातून अनेकांच्या जीवनामध्ये बदल घडेल व लोककल्याणाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!