खापरखेडा :- अंतर्गत मौजा नगरधन, यातील फिर्यादी पिडीता व आरोपी नामे-बचन भगवानदास युवनाते वय २४ वर्ष राहणार चिंचोली बाबुळखेडा खापरखेडा यांच्यात पूर्वी प्रेम संबंध होते. फिर्यादी पिडीता हिने आरोपी सोबत संबंध तोडल्याने आरोपीने फिर्यादीस वारंवार फोन करून माझ्यासोबत बोल व मला भेटायला ये, असे बोलून दिनांक ०२.१२.२०२३ चे १७.३० ते १८.०० वा दरम्यान, पिडीताला भेटायला बोलवून तिचे सोबत लज्जास्पद बोलुन फिर्यादीची छेडछाड केली, तसेच फिर्यादीला म्हणाला की तू मला सोडून गेली तर तुला बर्बाद करून तुझा तमाशा करीन? अशी धमकी देऊन निघून गेला.
सदर प्रकरणी फिर्यादी पिडीता हीचे रिपोर्टवरून पोस्टे खापरखेडा येथे आरोपी नामे वचन भगवानदास युवनाते वय २४ वर्ष राहणार चिंचोली बाबुळखेडा खापरखेडा यांचे विरूध्द कलम ३५४(अ), ३५४(ड), ५०६ भा. दं. विअन्वयें गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मलकुवार पो स्टे खापरखेडा हे करीत आहे.