नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. २ चे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत, पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आनंद भंडार बिल्डींग, धरमपेठ, सिताबर्डी, नागपूर येथील फ्युजन कॅफे मध्ये रेड कारवाई केली असता, तेथे आरोपी कॅफे मालक १) मयंक गौरीशंकर अग्रवाल, वय ३७ वर्ष, रा. ईतवारी, नागपूर २) मॅनेजर, बिट्टू किसन मरकाम वय २५ वर्ष रा. बंसीनगर, हिंगणा रोड, नागपूर हे स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता ग्राहकांना प्रतिबंधीत तंबाखुजन्य हुक्का पदार्थ सेवनाकरीता पुरवीतांना समक्ष मिळुन आले, त्याने ताब्यातुन हुक्का पार्लर करीता उपयोगात येणारे साहित्य ११ नग हुक्का पॉट, वेगवेगळे फ्लेव्हरचे तंवाख्खु व ईतर साहित्य असा एकुण २६,८६०/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींचे विरूध्द पोलीस ठाणे सिताबर्डी येथे कलम ४(१), ५(१), २१ सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादने अधिनीयम २००३ महाराष्ट्र सुधारणा अधिनीयम २०१८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई कामी सिताबर्डी पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, मपोनि. शुभांगी देशमुख, सपोनि. चांभारे, पोहवा. महेन्द्र सडमाके, राजेश तिवारी, दिनेश डवरे, संदीप चंगोले, शैलेष जांभुळकर, पोअं. सुनिल कुंवर व मंगल जाधव यांनी केली.