नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. २ पथकाचे अधिकारी व अंमलदार हे गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशिर माहीतीवरून आरोपी जुनेद बशिर खान, वय ४० वर्षे, रा. आय. बि.एम. रोड, गिट्टीखदान, नागपुर याने पराजवळील पानठेल्याची कायदेशिररित्या झडती घेतली असता, आरोपी हा त्याचे पानठेल्यात शासनाने प्रतिबंधीत केलेली वेगवेगळ्या कंपनीची सुगंधीत तंबाखु व गुटखा किंमती अंदाजे १३,९८५/-रु. या मुद्देमाल बेकायदेशीर रित्या विकीकरीता बाळगताना मिळुन आल्याने, नमुद मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीचे कृत्य हे कलम ३२८, २७२, २७३, १८८ भा.दं.वि. अन्वये होत असल्याने पुढील कार्यवाही कामी मुद्देमालासह आरोपीस पोलीस ठाणे गिट्टीखदान यांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, मपोनि शुभांगी देशमुख व त्यांचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.