अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई

मौदा :- पोलीस स्टेशन मौदा हद्दित पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, एक इसम ॲक्टिव्हा गाडीने जयस्तंभ चौका कडुन बस स्टॉप कडे देशी दारुची अवैधरित्या विनापरवाना वाहतुक करीत असल्याची माहीती मिळाल्याने जयस्तंभ चौकात नाकाबंदी करुन होन्डा अॅक्टिव्हा मोपेड क्र. MH-40/AS-0510 चे चालक नामे नितीन लक्ष्मीनारायण जैयस्वाल, वय ४० वर्षे, राह. कृष्ण मंदीर जवळ मौदा याला पकडण्यात आले, त्याचे मोपेडची झडती घेतली असता मोपेडवर ठेवलेल्या पांढ-या पिशवीत देशी दारुच्या दोन पेट्या ज्यामध्ये १८० मि.ली. ने भरलेल्या ९६ निपा मिळुन आल्याने आरोपी नितीन लक्ष्मीनारायण जैयस्वाल, वय ४० वर्षे, राह. कृष्ण मंदीर जवळ, मौदा याचे ताब्यातुन देशी दारूने भरलेल्या १८० मि.ली. ने भरलेल्या ९६ निपा कि. ६,७२०/-रु. व होन्डा अॅक्टिव्हा मोपेड क्र. MH-40/AS-0510 कि. ५०,०००/-रु. असा एकुण ५६,७२०/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात येवुन आरोपी विरुद्ध पोस्टे मौदा येथे अप क्र. ८०७/२०२४ कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ,संतोष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, कन्हान यांचे मार्गदर्शनात प्रमोद घंगि पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन मौदा यांचे सोबत पोलीस स्टाफ पोउपनि महेश बोथले, पोहवा संदीप कडु, गणेश मुदमाळी, रुपेश महादुले, पोना दिपक दरोडे,, पोशि आतिश गाढवे यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलीस स्टेशन मौदा येथील जुगार अडडयावर धाड

Tue Aug 20 , 2024
मौदा :- पोलीस स्टेशन मौदा हहित पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, मौजा दिघोरी काळे शेत शिवारात काही ईसम हे ५२ ताशपत्त्यावर पैश्याची बाजी लावुन हारजितचा जुगार खेळत आहे. अशा माहितीवरुन दिघोरी काळे शेत शिवारात गेलो असता काही ईसम हे पडीत शेतात तासपत्त्यावर जुगार खेळतांनी दिसले. यावरुन त्यांना घेराव टाकुन पकडण्यास गेलो असता काही ईसम मौक्कावरुन पळुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com