मौदा :-दिनांक ०४/०६/२०२४ रोजी ये रात्री दरम्यान पो. स्टे, मौदा येथील स्टाफ पोस्टे हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन तसेच अवैध गोवंश वाहतूकीस आव्ळा घालणेकरिता स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना भंडारा ते नागपूर NH-53 रोडवर टाटा योद्धा लहान मालवाहू वाहणातून अवैधरित्या निर्दयतेने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने मौदा येथील रबडीवाला टी पॉईंट समोर NH 53 रोडवर नाकाबंदी करून, वाहने तपासत असताना एक टाटा योद्धा मालवाहू वाहन येतांना दिसले त्या वाहनावर संशय आल्याने त्यास टॉर्च च्या सहाय्याने ईशारा देऊन थांबविण्यास सांगितले असता पोलिसांना पाहून वाहन चालकाने वाहण काही अंतरावर थांबवून अंधारा चा फायदा घेऊन मोक्यावरून पळून गेला त्याचा पाठलाग केला असता मिळून आला नाही. सदर वाहनाची पाहणी केली असता टाटा योद्धा वाहन क्र. MH-40/CD-5178 मध्ये १६ गोशिय जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबून, आखूड दोरखंडाने बांधुन व जनावरांची चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तली करिता घेऊन जातांना मिळून आल्याने आरोपीच्या ताब्यातून १६ गोवंशिय जनावरे प्रत्येकी १०,०००/- रू. प्रमाणे १,६०,०००/- रू व टाटा योद्धा वाहन कि. ६,००,००० असा एकूण ७,६०,०००/- रू चा माल जपण करण्यात आला असून गोपशिय जनावरांना पोग्य व्यवस्थापनार्थ गोरक्षण केंद्र, भंडारा येथे दाखल करून फरार आरोपी विरुद्ध कलम ११(१) (प) (ड) (च) प्रा. छळ प्रति. अधि. १९६० सहकलम ५ अ (१),९ महा. प्रा. सं. सुधारित अधि. २०१५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पो. अधिकारी कामठी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार व पो.नि. सतीशसिंह राजपूत, पोउपनी महेश बोथले, पो. हवा. संदीप कडू, पो.हवा. गणेश मुदमाळी, पो. हवा. रुपेश महादुले, पो.हवा सतीश नागपुरे, पो. अं अतिश गाढवे यांनी केलेली आहे.