मौदा :- पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ पो. स्टे. मौदा हद्दीत स्टाफसह अवैध गोवंश वाहतूकीस आळा घालण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना भंडारा ते नागपूर NH-53 रोडवर १२ चाकी L- P- ट्रक क्र. MH-35/k-5123 मधून अवैधरित्या निर्दयतेने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने मौदा येथील खड़ीवाला 1 पॉईंट समोर नाकाबंदी दरम्यान ट्रकला थांबवून पाहणी केली असता ट्रक क्र. MH-35/k-5123 मध्ये २२ गोवंशिय जनावरे अत्यंत निर्दयतेने कोंबून, आखूड दोरखंडाने बांधुन व जनावरांची चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तली करिता घेऊन जातांना मिळून आल्याने ट्रक चालक नामे- राहुल शिशुपाल बमगाय, वय ३० वर्ष, रा. चिपोटा ता. देउरी जि. गोंदीया व वाहक नविन राजकुमार दख्खनवार, वय २४ रा. चंगेरा ता. जि. गोंदीया यांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून २२ गोवंशिय जनावरे प्रत्येकी १५,०००/-रू. प्रमाणे ३,३०,०००/-रू. व ट्रक १०,००,०००/- रू. असा एकूण १३,३०,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर टूक मधील गोवशिय जनावरांना योग्य व्यवस्थापनार्थ ज्ञान फॉउंडेशन गोरक्षण केंद्र भंडारा येथे दाखल करून आरोपीतां विरुद्ध कलम ११(१) (ड) प्रा. छळ प्रति. अधि, १९६० सहकलम ५ अ (१), ९ महा, प्रा. सं. अधि. १९७६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान डॉ. संतोष गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मौदा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, पोलीस हवालदार संदीप कडु, गणेश मुदमाळी, रुपेश महादुले, राजेंद्र गौतम, पोलीस नायक दिपक दरोडे, पोलीस अंमलदार अतुल निंवारते, शुभम ईश्वरकर यांनी केलेली आहे.