मालमत्ता कर भरणा न करणा-यांचे साहित्य जप्त
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सतरंजीपुरा झोनमधील मालमत्ता कर न भरणा-या ५ थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपायुक्त (महसूल) मिलींद मेश्राम यांच्या आदेशान्वये थकबाकीदारांवर कारवाई करण्यात आली.
सतरंजीपुरा झोनमधील ५ मालमत्ता धारकांवर एकूण २,९1,७८२ रुपये मालमत्ता कर थकीत होता. त्यामुळे या थकबाकीदारांकडील मौक्यावर प्राप्त झेरॉक्स मशीन, सिलाई मशीन, सोपासेट, पलंग, टी.व्ही. दुचाकी वाहन इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले होते. यापैकी मौक्यावर १,०२,५२४ रुपयांच्या कराचा भरणा थकबाकीदारांनी धनादेशाद्वारे केला. मालमत्ता कराचा भरणा करणा-या मालमत्ता धारकांना त्यांची साहित्य सुपूर्द करण्यात आले.
झोनचे सहायक आयुक्त घनश्याम पंधरे यांच्या मार्गदर्शनात सहायक अधीक्षक विजय थुल, कर निरीक्षक लांबट, भैसारे, रामटेके यांच्या नेतृत्वातील प्रशांत खडसे, कमलेश उमरेडकर, रमेश तांबे या पथकाद्वारे कार्यवाही पूर्णत्वास नेण्यात आली.