नागपूर :-आरोपी मनोज श्यामलाल डोंगे यांची सन्मानीय अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी, नागपुर यांच्याद्वारे निर्दोष मुक्त करण्यात आले.
आरोपीवर अन्न भेसड कायदा अनंव्ये u/s १६ (१) (a) (i) व रूल ३२ (c) (e) अंतर्गत आरोप होते.
सरकार पक्षाचे असे कथन होते की, आरोपी मनोज यानी व त्यांचे वडिल श्यामलाल यानी यांचे मालिकीचे नेशनल सोडा फैक्टरी येथे भेसड़ युक्त कार्बोनेटेड वाटर चे प्रतिबधक बोटल तयार केले व सदर बाटली अन्न भेसड अधिकारी यांच्या मार्फत जप्त करण्यात आले. सदर बाटली रासायनिक प्रक्रियेसाठी पाठवुन त्याचा अहवाल प्राप्त झाला व आरोप मनोज व त्यांचे वडिल श्यामलाल विरुद्ध गुन्हा नोंदवून आरोपी विरुद्ध प्रकरण चालविन्यात आले. दरम्यान एकंदरित सरकार पक्षा द्वारे तक्रारदार व पंच शाक्षीदार तपासन्यात आले. सरकार पक्ष आरोपी विरुद्ध प्रकरण साबित करू शकले नाही, सदर प्रकरण शुरू असताना श्यामलाल डोंगे यांचा मृत्यु झाला. व सबल पुराव्या अभावी मनोज डोंगे यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. आरोपीच्या वतीने अँड राजेंद्र साहू, अँड गुरप्रीत सिंग चंडोक, अँड. योगेश हसोरिया, अँड. पराग कुसरे, ऋषभ मोजंनकर, गौरव साहू यानी बाजू मांडली.