नागपूर :- दिनांक २०.०८.२०२३ चे १७.०० वा. ते १७.३५ वा. चे दरम्यान पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत, कांजी पाउस चौक येथील कृष्णा दूध डेअरी समोर फिर्यादीचा भाऊ बादल नरेश पडोळे वय २५ वर्ष रा. भवानी माता मंदीर जवळ, पारडी, नागपुर यास आरोपी चेतन मदन सुर्यवंशी वय २५ वर्ष रा. कांजी हाउस चौक, यशोधरानगर, नागपुर यांन जुने भांडणाचे कारणावरून धारदार शस्त्राने पोटावर, कमरेवर वार करून गंभीर जखमी केले जखमीला फिर्यादी यांनी उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता तेथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. याप्रकरणी फिर्यादी विजय नरेश पडोले वय २३ वर्ष, रा. भवानी माता मंदीर जवळ पारडी नागपुर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे यशोधरा नगर येथे पोउपनि राठोड आरोपीविरूध्द कलम ३०२, भादवि.अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
जिवानिशी ठार मारणारा आरोपी ताब्यात
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com