काटोल :- दिनांक ०६/१०/२०२१ चे १६.३२ वा. दरम्यान फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरून पो.स्टे. काटोल येथे अप. ५१६ / २०२१ कलम ३०२, ३५४, ३५४(१), ३७६ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
दिनांक ०५/१०/२०२१ से १६.०० वा. ते १६.३० वा. दरम्यान यातील आरोपी अमलेशकुमार शंभु मंडल, वय १८ वर्ष, रा. गडीराधे नगर जि. सुफाल बिहार ह. मु. सावरगाव रोड काटोल याने मृतक सोबत बलात्कार करण्याच्या उद्देशाने मृतक हीच्या झोपडीवर पाळत ठेवुन नंतर झोपडीमध्ये प्रवेश करून मृतक हीच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. मृतक हिने आरोपीस विरोध केला असता यातील आरोपीने बळाचा वापर करून मृतकावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला दरम्यान मृतक ही झोपडीचे बाहेर स्वतः चा जिव वाचविण्याकरीता झोपडीतून पळत आली असता यातील आरोपी हा तिचे मागे आला व नमुद मृतक ही धावत असतांना जमिनीवर पडल्याने आरोपीने मृतक हिचे पाय पकडुन निर्दयीपणे जमिणीवरून ओढत घासत झोपडीच्या आतमध्ये नेवुन तिच्यावर बलात्कार करुन मृतक हीचा गळा दाबुन जिवानीशी ठार मारले.
सदर प्रकरणाचे तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज चौधरी यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. पी. डी. जे. अग्रवाल कोर्टामध्ये सादर केले. दिनांक ०४/१०/२०२३ रोजी मा. पी. डी. जे. अग्रवाल गो. यांनी वरील सदर गुन्हयातील आरोपीस कलम ३०२ भादवि मध्ये आजीवन कारावास व १०,०००/- रु. दंड, दंड न भरल्यास ०२ वर्ष सश्रम कारावास तसेच कलम ३५४ भादवि मध्ये ०५ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- रु. दंड, दंड न भरल्यास ०६ महीने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. सरकारचे वतीने ए.पी.पी. खापर्डे यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन पोशि/ ४०५ प्रमोद कोहळे पो स्टे काटोल यांनी मदत केली आहे.