लग्नाचे आमिष देऊन तरुणीशी जबरी संभोग करणारा आरोपी अटकेत

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 
कामठी, दी.16 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या परिसर रहिवासी एका 19 वर्षोय अल्पवयीन तरुणीला आरोपीने लग्नाचे आमिष देऊन चौधरी हॉस्पिटल जवळील एका घरात नेऊन 5 मार्च 2020 ते 11 सप्टेंबर 2021 दरम्यान वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. व तरुणीशी लग्न करण्यास नकार दिले यासंदर्भात पीडित तरुणीने आरोपीशी संपर्क साधला असता आरोपीने या पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात पीडित अल्पवयीन तरुणीने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अभिषेक नागपूरकर वय 24 वर्षे रा फवारा चौक, इतवारी नागपूर विरुद्ध भादवी कलम 376 (2)(एन)506 सहकलम 4,6 पोक्सो कायद्यांनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी पंचायत समिती कार्यलयात ' स्वच्छता ही सेवा ' उपक्रम 

Fri Sep 16 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी दि. 16 :- महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम दि.15 सप्टेंबर ते 2ऑक्टोबर 2022 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज 16 सप्टेंबरला पंचायत समिती कामठी येथे स्वच्छतेचे दूत संत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून स्वछता ही सेवा उपक्रम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com