नागपूर :- दिनांक ११.०४.२०२४ चे १८.३० वा. चे सुमारास, फिर्यादीचा परिचीत रोशन बन्सोड वय ४२ वर्ष रा. सुर्या रोड लाईन्स, वार्ड नं. १. सुराबर्डी, वाडी, नागपूर हा पोलीस ठाणे वाडी हद्दीतुन, अमरावती रोड वरील सारंग बार वडधामना रोडवरून रोड क्रॉस करीत असतांना शिवशाही बस क. एम. एच ०६ वी डब्लू ०१४० चे चालक नामे विजय अशोकराव निखाडे, वय ४३ वर्षे, रा. बुट्टीबोरी, जि. नागपूर याने त्याचे ताब्यातील बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन, फिर्यादीचे परिचीत रोशन बन्सोड यांना धडक देवून गंभीर जखमी केले, जखमी यास उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता डॉक्टरांनी तपासुन त्यास मृत घोषीत केले.
याप्रकरणी फिर्यादी संतोष दिगांबर वाडे, वय ५२ वर्षे, रा. सूर्या रोड लाईन्स, सुराबर्डी, नागपुर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे वाडी येथे पोउपनि निकाळजे यांनी बस चालक आरोपीविरूध्द कलम २७९, ३०४(अ) भा.द.वि. सहकलम १३४, १७७ मो. वा. का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.