नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत प्लॉट नं. १७, वांजरा येथे राहणारे फिर्यादी मुमताज अली ईरशाद अली अंसारी, वय ५० वर्ष, यांनी त्यांची ई-रिक्षा किंमती अंदाजे ५०,०००/- रू. ची ही घरासमोर लॉक करून उभी ठेवली असता, ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपासाकरून त्यांनी आरोपी क. १) मोहम्मद जसीम जीमल हुसैन, वय १९ वर्ष, रा. यशोधरानगर चौक, नागपूर २) मंथन विशाल भावे, वय १९ वर्ष, रा. यादव नगर, भिम चौक, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी संगणमत करून वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली, आरोपींना अधिक विचारपूस केली असता, त्यांनी यागुन्हया व्यतीरिक्त पुन्हा एक ई-रिक्षा चोरीचा गुन्हा केल्याचे सांगीतले. आरोपीचे ताब्यातुन ०२ ई-रिक्षा किंमती अंदाजे १,१०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मुद्देमालसह पुढील कारवाई करीता यशोधरानगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा युनिट क. ५ चे अधिकारी व अंमलदार यांनी केली.