कामठी :- पोलीस ठाणे नविन कामठी हद्दीत दीदी कॉलनी, कामठी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मोहंमद यासीन कमाल अर्शद कमाल वय २५ वर्ष यांनी त्यांची सुझुकी बर्गमॅन दुचाकी, काळया रंगााची क. एम. एच ४० सी एन २६१३ किंमती ८०,०००/- रू ची लॉक करून घरासमोर पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञान आरोपीने फिर्यादीची गाडी चोरून नेली, फिर्यादी यांनी पोलीस ठाणे नविन कामठी येथे दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात पोलीस ठाणे नविन कामठी येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक तपास करून तसेच मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन गन्हयातील आरोपी १) मोहंमद नौशाद उर्फ नस्सो मोहंमद रईस अहमद वय १९ वर्ष रा. प्लॉट नं. ९३४, महेबुबपुरा, योगी अरविंद नगर, नागपूर याला सुझुकी वर्गमॅन दुचाकी, काळया रंगााची क. एम. एच ४० सी एन २६१३ किंमती ८०,०००/- रू सह ताब्यात घेवुन त्याचे जवळील वाहना संबंधी विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हयातील वाहन आरोपी क. २) मोहंमद इमरान उर्फ चुहा मोहंमद असलम अंसारी वय २३ वर्ष, रा. अंसार नगर, डोबी, तहसील, नागपूर दोघांनी मिळून चोरी केल्याचे सांगीतले. व आरोपी कं. २) मोहंमद इमरान हा पोलीस ठाणे पाचपावली येथील चोरीचे गुन्हयात मध्यवर्ती कारागृह येथे बंद असल्याचे सांगीतले. मोहंमद इमरान यास मध्यवर्ती कारागृह येथुन प्रॉडक्शन वॉरंटवर घेवून आरोपींची अधिक सखोल विचारपूस केली असता, त्यांनी वरील गुन्हयातील गाडी व्यतीरिक्त २) पोलीस ठाणे नविन कामठी हरीतुन ग्रे रंगाची अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ३१ एम.एफ ८४९८ किंमती ४०,०००/- रू ची, ३) पोलीस ठाणे सदर हद्दीतुन एक ग्रे रंगाची अॅक्टीव्हा गाडी क. एम.एच ४९ वाय ११९० किंमती ४०,०००/- रू ची, ४) पोलीस ठाणे यशोधरा नगर हद्दीतून हिरो होंडा कंपनीची गाडी क्र. एम. एच ४९ वी क्यु ७०७२ किंमती ४०,०००/- रू चौ, ५) पोलीस ठाणे नंदनवन हद्दीतुन काळया रंगाची स्लेंडर क. एम. एच ४९ ए डी ३८९१ किंमती ३०,०००/- रु ची, चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन वरील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले. आरोपीचे ताब्यातुन एकुण ०५ चोरी केलेली वाहने एकुण किंमती २,३०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पोलीस ठाणे नविन कामठी येथील वाहन चोरीचे गुन्हयात अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान पोलीस ठाणे हद्दीतुन एक पांढऱ्या रंगाचा वर्गमॅन सुझुकी गाडी क. एम. एच ४९ बी.एस २५४५ किंमती २०,०००/- रूची तसेच काळ्या रंगाची अॅक्टीव्हा क. एम.एच ३१ सि.डी ८६७५ किंमती १०,०००/- रू ची लावारीस स्थितीत मिळुन आल्या आहे. त्यांचे चेचिस व इंजेन नंबर वरून पुढील तपास करून कारवाई करण्यात येते.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, पोलीस उप आयुक्त (परि क. ५), मा. सहायक पोलीस आयुक्त (कामठी विभाग) वांचे मार्गदर्शनाखाली वपोनि, प्रमोट पोरे, सपोनी सचीन यादव, पो. हवा. विशाल मेश्राम, पो.अ. विशाल पौनीकर, राहुल वाघमारे, नसीम अंसारी, हेमचंद सोनोने यांनी केली.