वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक, एकूण ०४ गुन्हे उघडकीस

नागपूर :- फिर्यादी संदीप सुरेश करडे, वय ३२ वर्षे, रा. लॉट नं. २, योगेंद्र नगर, गि‌ट्टीखदान, नागपूर यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर क. एम.एच. ०४ एफ.एस. ३१५४ किंमती १५,०००/- रू. ची पोलीस ठाणे मानकापुर हद्दीत, अंजना टाऊन, गोधनी येथे पार्कीगमध्ये ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे मानकापुर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासात मानकापुर पोलीसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून एका विधीसंघर्षग्रस्त बालकास त्याचे वडीलासमक्ष ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. विधीसंघर्षग्रस्त बालकाचे ताब्यातुन गुन्हयात चोरी केलेली हिरो होंडा वाहन जप्त करण्यात आले. विधीसंघर्षग्रस्त बालकास अधिक सखोल विचारपूस केली असता, त्याने पोलीस ठाणे मानकापुर हद्दीतुनच १) होंडा सिडी डॉन क. एम. एच. ३१ वि. एत्त. ९३४१ तसेच, २) सिडी १०० काळ्या सिल्व्हर रंगाची दुचाकी क. एम. एच. ३१ ए. एन. १७३२ ३) एम. एच. ३१ बि. एम. ५७५६ असे एकुण चार वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. विधीसंघर्षग्रस्त बालकाचे ताब्यातुन चार गुन्हे उघडकीस आणुन चार दुचाकी वाहने किंमती अंदाजे एकूण ६०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी रविंद्र सिंघल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी, सह, पोलीस आयुक्त नागपूर शहर, प्रमोद शेवाळे, अपर पो. आयुक्त (उत्तर विभाग) नागपुर शहर, राहुल मदने, पोलीस उप आयुक्त (परी. क. २), सुनिता मेश्राम, सहा. पोलीस आयुक्त (सदर विभाग), यांचे मार्गदर्शनाखाली, वयोनि, प्रशांत ठवरे, पोनि. अमोल इंगळे, पोउपनि. अमित देशमुख, पोहवा. राजेश बरणे, राहुल गवई, पोअं. मिलींद नासरे, प्रशांत खंडारे, विपीन रखे व कैलास मुले यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घातकशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

Fri Oct 11 , 2024
नागपूर :- पाचपावली पोलास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, बारसे नगर, सरकारी शौचालय जवळ, कलकत्ता रेल्वे लाईन जवळ, एक संशयीत ईसम पोलीसांना पाहुन पळण्याचे प्रयत्नात असतांना, त्यास घेराव टाकून ताब्यात घेतले. त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव सतीष रतनलाल गौर, वय ३२ वर्षे, रा. ज्योती नगर खदान, डागा हॉस्पीटल मागे, तहसिल, नागपुर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com