चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत प्लॉट नं. १४, बेलदारनगर, नरसाळा रोड, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे शुभम महेन्द्र बोकडे, वय ३० वर्षे हे त्यांचे घरा समोरील टाईमन्ब्रेक ई-स्पोर्टस, लाऊंज गेमींग झोन नावाचे दुकान बंद करून घरी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे दुकानातील मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एक्स बॉक्स सिरीज सिस्टम, सोनी कंपनीचे पीएस ५ चे तिन सिस्टम, सोनी कंपनीचा एक व्हीआर जुवा, पि.सी.यू. सि.पी.यू व रिमोर्ट असा एकुण किंमती अंदाजे ३,२०,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हयाचे तपासात हुडकेश्वर पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी जयेश मोरेश्वर सतीकोसरे वय २१ वर्ष रा. प्लॉट नं. ११. राधाकृष्ण नगर, वाठोडा, नागपूर यास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपीने नमुद चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन व्हीडीयो गेमचे वरील प्रमाणे चोरी गेलेले साहित्य व एक हिरो कंपनीची मेस्ट्रो मोपेड गाडी असा एकुण किंमती अंदाजे ३,२०,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, सह पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पोलीस उप आयुक्त (परि. क. ४), सहा. पोलीस आयुक्त (अजनी विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, ज्ञानेश्वर भेदोडकर, पोउपनि, माधव गुंडेकर, सफौ, शैलेष ठवरे, नंदकिशोर तायडे, पोहवा. गणेश बोदरे, नापोअं, राजेश मोते, राजेश धोपटे, मुकेश कन्नाके पोअं, मयुर सातपुते, नितेश कड्डु, हिमांशू पाटील, कुणाल उके व मपोहवा, शारदा भरे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

Sun Aug 4 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे पाचपावली हटीत प्लॉट नं. ३५, विरचक ले-आउट, पाचपावली, नागपूर येथे राहणारे फिर्यादी भरोशकुमार यादव, वय ३१ वर्षे, यांनी त्यांची डिलक्स मोटरसायकल क. एम.एच. २४ जे.एन ०४७९ किंमत्ती अंदाजे ३०,०००/- रू. ची पोलीस ठाणे सदर हद्दीत डी.आर.एम ऑफीस, गुंजन भवन, येथे लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सदर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com