नागपूर :- फिर्यादी ईश्वर वामनराव भोकसे, वय ३८ वर्ष, रा. कोहली ता. कळमेश्वर जि. नागपूर याने आपले शेतात बांधलेले दोन रुम मध्ये ठेवलेले गाई ढोरे करीता ११ ठेपाचे बॅग किंमती १४,०००/- रू. व ट्रॅक्टर मध्ये टाकण्या करीता तिन कैन मध्ये ठेवलेले ६० लिटर डिझल किंमती ६०००/- रू. असे एकूण २०,०००/- रु. चा मुद्देमाल यातील आरोपी क्र. ०१ यांनी चोरी करुन नेल्याचे तोंडी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग सावनेर व पोनी योगेश कामाले यांचे मार्गदर्शनात, पो.उप नि कोलटे, पोहवा नवेद खान, पोशि निखील कनोजिया, पोशि मनिष सोनवने यांनी केले असुन सदर गुन्ह्याचे तपासात यातील पोहवा नवेद खान यांनी गोपनिय माहिती काढुन आरोपी क्र. १) मनोज गिरीधर झाडे वय ३२ रा. खापरी कोठे, तह. कळमेश्वर यास पाहुणी, तह. मोहाळी, पो.स्टे. वरठी जि. भंडारा यास ताब्यात घेवुन विचारपुस करुन सदर गुन्ह्यात अटक केली. सदर आरोपी याने सदर गुन्ह्यात आणची दोन आरोपी असल्याचे सांगितल्याने यातील आरोपी क्र. २) तनविर युनुस कुरेशी, वय २५ वर्ष, रा. धापेवाडा, इंदिरागांधी नागर, ता. सावनेर व आरोपी क्र. ३) मंगेश रतिराम ऊईके, वय २३ वर्ष, रा. वार्ड क्र. ०२, इंडीयन ऑईल पेट्रोलपंप, धापेवाडा बुजुर्ग, तह. कळमेश्वर जि. नागपुर यास अटक करून सदर तिन्ही आरोपी यांनी चोरी केलेला माल आरोपी क्र. ४) भरत शेला अलगोतर, वय २४ वर्ष, रा. नोवा कॉलेज जवळ, खापरी तह. कळमेश्वर जि. नागपुर विकल्याचे सांगितल्याने सदर चारही आरोपी कडून ०१) एम एच-४०/सि एम ६४७२ किंमती ४,००,०००/- रू. (०२) नगदी ४१००/-रु. ०३) ०४ बोरे ढेपाचे किंमती ५०००/-रू. असा एकुण ४,०९,१००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कळमेश्वर येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक पोनी योगेश कामाले, पो.उप.नि कोलटे, पोहवा नवेद खान, पोशि निखील कनोजिया, पोशि मनिष सोनवने, पोहवा नवेद खान यांनी पार पाडली.