अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीस अटक, वाहनासह एकुण १५,२५,००० रू. /- रूपयाचा मुद्देमाल जप्त

भिवापूर :- दि. १२/०७/२०२४ रोजी पोस्टे भिवापूर येथील स्टाफ पो.स्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, एक रेतीने भरलेला टिप्पर हा निलज कडुन भिवापूर उमरेडच्या दिशेने येत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनीय खबर वरून स्टाफचे मदतीने तहसिल कार्यालय भिवापुर येथे नाकाबंदी करून १० चक्का टिप्पर कं. एम एच ३३/टी २३३३ चा चालक आरोपी नामे-१) रितीक रवीद्र अहीरकर वय २० रा निलज ता पवनी जि भंडारा यास थांबवुन स्टाफने पाहणी केली असता वाहनामध्ये अंदाजे ०५ ब्रास रेती मिळून आल्याने सदर टिप्पर चालकास टिप्पर मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीच्या ताब्यातून १० चक्का टिप्पर कं. एम एच ३३/टी २३३३ किंमती १५,००,०००/- रु. मध्ये ०५ ग्रास रेती किंमती २५,०००/- रू. असा एकूण १५,२५,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे-१) रितीक रवीद्र अहीरकर वय २० रा निलज ता पवनी जि भंडारा २) मालक नामे सचिन मांडवकर रा खरबी चौक नागपुर यांचेविरुद्ध पोस्टे भिवापूर येथे कलम ३०३(२), ४९, ३(५) भारतीय न्याय संहीता २०२३ सहकलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ सहकलम ४. २१ खानी आणि खनिजे अधिनियम १९५७, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील आरोपी बालक यास अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे भिवापूर येथील ठाणेदार सपोनि जयप्रकाश निर्मल, सफौ तुलाराम खडसे, पोशि कमलेश कोहळे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्व पात्र महिलानी लाभ घ्यावा - आमदार टेकचंद सावरकर

Mon Jul 15 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरुवात केली आहे. 21 ते 65 वर्षेपर्यंतच्या वयोगटातील सर्व पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये शासन त्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे.ज्यांचे ऑगस्ट पर्यंत अर्ज आले असतील अशा लाभार्थीना सुद्धा जुलै महिन्याची 1500 रुपये रक्कम मिळणार आहे.या योजनेनुसार महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत मिळणार असून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com