नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ४ चे अधिकारी व अंमलदार पेट्रोलीग करीत असतांना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीत पलॉट नं. १६, रेल्वे कॉसिंग जवळ, मनिष नगर जवळील, ओयो हॉटेल येथे काही ईसम ग्राहकांकडून पैसे घेवुन अल्पवयीन मुलीकडून देह व्यापार करवून घेत आहेत. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन पंच समक्ष रेड कारवाई केली असता, नमुद ठिकाणी आरोपी क. १) अलोक राजेन्द्र रैकवार वय ३४ वर्ष रा. ८५ पॉट एरीया, रमा नगर, अजनी, नागपूर २) हॉटेल मॅनेजर धिरज रविन्द्र खुड़े वय २५ वर्ष रा. राकेश ले-आउट, एलॉट नं. १०१.बेलतरोडी, नागपूर ३) गजानन रामहरी सोनवने वय ४० वर्ष रा. अमर संजय सोसायटी, मनिष नगर, नागपूर हे त्याचे आर्थिक फायदयाकरीता अल्पवयीन मुलीस पैश्याचे आमीष दाखवुन तसेच धमकावुन देह व्यापारा करीता ग्राहकाकडून पैसे घेवुन देह व्यवसाय करवून घेतांना समक्ष मिळुन आले, आरोपींचे ताब्यातुन एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली, आरोपी हे पाहिजे आरोपी क. ४) हॉटेल मालक राकेश बलवीरसिंग चावला वय ५५ वर्ष ५) आशिष राकेश चावला वय २७ वर्ष दोही रा. छत्रपती चौक, नागपूर यांचे सोबत संगणमत करून आरोपीचे व ग्राहकांचे ओळखपत्राची शहानिशा न करता रजिस्टर मध्ये कोणतीही नोंद न घेता आरोपींना रूम उपलब्ध करून देतात, पोलीस ठाणे बेलतरोडी येथे आरोपोंविरूध्द करुम ३७०, ३७० (अ), ३४ भा.दं.वी सहकलम ३, ४, ५, ७ अनैतीक व्यापार प्रतिबंधक अधिनीयम १९५६ सहकलम ४, ८, १२ पोक्सो कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींचे ताब्यातुन रोख ५,०००/- रू. पाच मोबाईल फोन, मोटरसायकल, इतर साहित्य असा एकूण ८५,०३०/- रू किमती चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी क. १ ते ३ यांना अटक करण्यात आली आहे. पाहिजे आरोपींचा शोध व पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्याम सोनटक्के, सपोनि अयुब संदे, पोउपनि वैभव बाररी, अविनाश जायभाये, पोहवा अतुल चाटे, पुरूषोत्तम काळमेघ, युवानंद कडु, नापोअ येत्तन गेडाम, अजय पवनीकर, मपोहवा शुभांगी दातीर, सुवर्णा बावनकर, यांनी केली.