नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हदीत सक्करदरा चौक ते सक्करदरा बस स्टॉप दरम्यान पोलीस ठाणे कुही हददीत राहणारी १७ वर्षीय फिर्यादी पिडीता ही तिचे मैत्रीणी सोबत पायदळ कॉलेज मध्ये जात असता आरोपी सोनू उर्फ गैंडा राजकुमार दांडेकर, वय २४ वर्षे, रा. भाई प्लॉट, रविदास मंदीर समोर, नागपूर याने पाठलाग करून पिडीतेला तु सुंदर दिसत आहे. तुझा मोबाईल नंबर दे ” आरोपी हा बसमध्ये फिर्यादीच्या बाजुला सिटवर बसुन फिर्यादीचे मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून, तिचा विनयभंग केला. व फिर्यादिस मोबाईल नंबर दिला नाही तर तुला जिवाने ठार करील” असे म्हटले. फिर्यादी मुलीने फोन करून वडीलांना बोलाविले असता आरोपीने त्यांनासुध्दा अश्लिल शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी हिने दिलेल्या तकारी वरून पोलीस ठाणे सक्करदरा येथे पोउपनि सिंग आरोपी विरुद्ध कलम ३५४ (ड), २९४, ५०६ (६) भा.दं.वि. सहकलम ८ १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेवून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com