अवैध्यरीत्या देशी दारुची वाहतुक करणाऱ्या आरोपींना अटक

– स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

नागपूर :-दिनांक २२/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन भिवापूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरव्दारे महिती मिळाली की, भिवापूर हद्दीतील भिवापूर नक्षी रोड येथे गाडी क्र. MH 40 CP4336 ने दारूची अवैध वाहतूक होत आहे अशा माहितीवरून गाडी क्र. MH 40 CP4336 ने अवैद्यरित्या दारू वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना नाकाबंदी केली असता आरोपी नामे १) सुभाष बालक गजभिये रा. भिवापूर जि. नागपूर २) करण नरेंद्र धनविजय रा भिवापूर यांच्या ताब्यातून विनापरवाना व अवैधरीत्या १) १९२ निषा देशी दारू किंमती १३४४०/-रु. २) गाडी क्र. MH 40 CP4336 किंमती ६०००० असा एकूण ७३४४०/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. यातील आरोपींना अटक करण्यात आले आहेत, जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कायदेशीर कारवाईकरीता पोलीस स्टेशन भिवापूर यांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे पोहवा अरविंद भगत स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. भिवापूर येथे आरोपींविरुध्द कलम ६५ A, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष ए. पोहार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक आशिष मोरखेडे, पोलीस हवालदार अरविंद भगत, गजेंद्र चौधरी, पोलीस अंमलदार राकेश तालेवार चालक मनीष भुते यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चाळीस हजाराचा लॅपटॉप पाच हजारात विकला

Fri Nov 24 , 2023
– जुगार खेळण्यासाठी नागपूर स्थानकावर चोरी नागपूर :- एका प्रवाशाचा लॅपटॉप चोरून पाच हजारात विकला. मिळालेल्या पैशात जुगार खेळला आणि संपूर्ण पैसे जुगारात हारला. शिवा शेरवाई (51) रा. तामिलनाडू असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरपीएफच्या पथकाने त्याला पकडून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. परतवाडा येथील रहिवासी सारंग घाटी (21) चंदीगढला शिकतो. प्रशिक्षण असल्याने तो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com