नागपूर :- यशोधरानगर पोलीसांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून सापळा रचुन पोलीस ठाणे हद्दीत, यशोधरा लॉन समोर, स्वरा ट्रेडर्स चे मागे रोडवर, भिलगाव येथे रेड कारवाई केली असता नमुद ठिकाणी आरोपी १) अर्शद अशोक गेडाम वय २६ वर्ष रा. खसाव्ळा, कामठी रोड, कपिल नगर २) अखील राजु शेख वय २४ वर्ष रा. जामा मस्जिद जवळ, मोहम्मद अली रोड, मोमीनपुरा, नागपूर ३) विरेन्द्र पांडुरंग उईके वय २४ वर्ष रा. भांडवाडी, गोडपूरा, पारडी, नागपूर ४) सारग पदमानंद कोवे वय २० वर्ष रा. भांडेवाडी, गोंडपूरा, पारडी, नागपूर ५) सुनील राधेश्याम कुवेरती वय २५ वर्ष रा. छपरा, जि. शिवनी, मध्य प्रदेश, ह. मु नाका नं. २, भिलगाव, यशोधरानगर, नागपूर हे स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता विना परवाना अवैधरित्या चोरीची रेतीची वाहतुक करतांना समक्ष मिळुन आले, आरोपींचे ताब्यातुन एक अशोक ले-लॅण्ड कंपनीचा ट्रक के. एम.एच ३१ सी क्यु १८९२, एक टाटा पिकअप गाडी क. एम.एच ३४ ए.व्ही ३१९७, एक बोलेरो पिकअप वाहन एम.एच ४० ए. के ४७८७, एक जे.सी.बी ट्रेलर एम.एच. ४० सि.व्ही ७६६५, एकुण १० ब्रास रेती, एक मोबाईल फोन असा एकुण किमती अंदाजे ५८,७४,५००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पाहिजे आरोपी क. ६) गाडी मालक अश्विन उर्फ विक्की अशोक गेडाम वय ३० वर्ष रा. जिभकाटे नगर, मसाळा, नविन कामठी, नागपूर याचा शोध सुरू आहे.
यातील वर नमुद आरोपी यांचे कडे रेती वाहतुकीचा परवाना नसतांना सुध्दा अवैध रेतीची चोरी करून वाहतुक करून शासनाचे आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी फिर्यादी पोहवा गणेश गुप्ता पोलीस ठाणे यशोधरानगर यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे पोउपनि राठोड यांनी आरोपींविरूध्द कलम ३७९, ३४ भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी क. १ ते ५ यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.