अवैधरित्या चोरटी वाहतुक करणारा आरोपी अटकेत, एकूण १५,४०,०००/रु चा मुद्देमाल जप्त

मौदा :- पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ पो. स्टे. हद्दीत अवैध रेती वाहतूकीस आळा घालणेकरिता पेट्रोलिंग करीत असताना मौजा तारसा शिवारात कन्हान रोड तारसा मार्गे निमखेडा कडे टिप्पर क्र. MH-४०-CM-६१२७ हा जाताना दिसल्याने तारसा शिवारात नमूद टिप्परला थांबवून पाहणी केली असता टिप्पर क्र. MH-४०/CM-६१२७ मध्ये अंदाजे ६ ब्रास रेती मिळून आल्याने सदर ट्रक चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगितले व सदरची रेती ही चोरीची असल्याची सांगून टिप्पर मालक किशोर भोले याचे सांगण्यावरून रेतीची विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे सांगितले यावरून सदरहू रेती ही अवैध व विनपरवाना असल्याची खात्री झाल्याने टिप्पर क्र. MH-४०-CM -६१२७ किं, रु. १५,००,०००/- व त्यामधील ६ ब्रास रेती किंमती रु. ३०,०००/- व विवो कपंनी चा मोबाईल किं. १०,०००/- असा एकूण रु. १५,४०,०००/-रु चा मुद्देमाल जप्त करून टिप्पर चालक नामे वीरेंद्र चंदू मार्कडे वय २७ वर्ष रा. नरसाळा ता. मौदा जि. नागपूर तसेच टिप्पर मालक नामे किशोर तुळशीराम भोले रा. नरसाळा ता. मौदा यांचेविरुद्ध कलम ३७९, १०९ भा. द. वी. सहकलम ४८ (७),४८(८) महा. ज. म. स. सहकलम ४,२१, खाणी आणि खनिजे अभी. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. मौदा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण,  रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक, ना ग्रा. मा. उपविभागीय पो. अधिकारी कामठी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार व पो.नि. सतीशसिंह राजपूत, पोउपनि महेश बोथले, पो. हवा. संदीप कडू, पो. हवा. गणेश मुदमाळी, पो. हवा. रुपेश महादुले, पो. ना दीपक दरोडे यांनी केलेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोळसा चोरी करणाऱ्या आरोपीस नागपूर ग्रामीण पोलीसांनी केली अटक

Mon Apr 8 , 2024
कन्हान :- अंतर्गत खदान नं. ०६ कन्हान, पारशिवनी येथे दिनांक ०६/०४/२०२४ चे ०४.०० वा. दरम्यान पोस्टे कन्हान येथील स्टाफ पोस्टे कन्हान हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, खदान नं. ०६ कन्हान मधुन एक इसम मोटार सायकलवर बोरीत कोळसा भरून खदान परिसरातुन चोरून घेवुन जात आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून स्टाफ यांनी मोसा. क्र. एम. एच-३६/ए. एम ७४९१ चा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com