अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीस अटक, वाहनासह एकूण ४०,५०,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त

मौदा :- दिनांक २०/०६/२०२४ चे १७.२५ वा. ते १८.१५ वा. दरम्यान पोस्टे मौदा येथील स्टाफ पो. स्टे. हद्दीत अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबर द्वारे माहिती मिळाली की, भंडाराकडुन मौदाकडे एक टूक एल पी वाहनामध्ये अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक केल्या जात आहे. प्राप्त खबरे नुसार वडोदा शिवार स्वप्नील ढाबा समोर नाकाबंदी करून रेती वाहतुकीच्या एलपी ट्रकला थांबवून पाहणी केली असता टाटा कंपनीचा १४ चक्का ट्रक क्र. एम एच ३४/बी.झेड ३६३५ मध्ये अंदाजे १० ब्रास रेती मिळून आली. ट्रक चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगितले. सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने १४ यक्का ट्रक क्र. एम एच ३४/बी. झेड ३६३५ किंमती ४०,०००००/- रू. तसेच त्यामधील १० ब्रास रेती किंमती रु. ५०,०००/- असा एकूण रु. ४०,५०,०००/- चा मुड़ेमाल जप्त करून ट्रक चालक नामे-१) इरफान शाह अब्दुल्लाह शाह वय ३३ वर्ष, रा. मदरासी बाबा नगर ता. जि. अमरावती २) मालक नामे मुदस्सर हुसैन अल्ताफ हुसैन रा. अन्सार नगर अमरावती यांचे विरुद्ध पोस्टे मौदा येथे कलम ३७९, १०९, ३४ भा. द. वी. सहकलम ४८ (७), ४८(८) महा. ज. म. स. सहकलम ४, २१ खाणी आणि खनिजे अधी. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. मौदा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मौदा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, पोहवा सतिश नागपुरे, पोहवा राजेंद्र गौतम, पोशि अतुल निंबार्ते, शुभम ईश्वरकर यांनी केलेली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीतांना अटक

Mon Jun 24 , 2024
मौदा :- मौदा अंतर्गत धानला शिवार येथे दि. २१/०६/२०२४ चे ०९.३० वा. दरम्यान फिर्यादी नामे लता कवडु कारेमोरे वय ४४ वर्ष रा. वार्ड क्र. ४ धानला ता. मौदा जि. नागपूर यांची बहीन सुनिता मारोती वेदय वय ५४ वर्ष हिला वडीलांनी १ एकर शेती यावर्षी स्वतः वाहायची होती त्याकरीता यातील आरोपी भाउ यास बोलली होती परंतु भाउ धनराज मारोती वैद्य, वय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com