मौदा :- पोस्टे मौदा येथील स्टाफ पो. स्टे. हद्दीत अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबर द्वारे माहिती मिळाली की, भंडारा कडुन मौदाकडे एक ट्रक वाहनामध्ये अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक केल्या जात आहे. प्राप्त खबरे नुसार मौदा शिवार नायरा पेट्रोलपंप येथे नाकाबंदी करून रेती वाहतुकीच्या एलपी ट्रकला थांबवून पाहणी केली असता १४ चक्का ट्रक क्र. एम एच ३४/बी. शेड ७४८७ मध्ये अंदाजे १० ब्रास रेती मिळून आली. ट्रक चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्यांनी रॉयल्टी नसल्याचे सांगितले. सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने १४ चक्का ट्रक क्र. एम एच ३४/वी ड्रोड ७४८७ किंमती ४०,००,०००/- रू. तसेच त्यामधील १० ब्रास रेती किंमती रु. ५०,०००/- असा एकूण रु. ४०,५०,०००/- वा मुद्देमाल जप्त करून ट्रक चालक नामे १) अनिकेत दिपकराव देसाई वय २६ वर्ष, रा. लहरी बाबा टेम्पल लक्ष्मी नगर अमरावती ता. जि. अमरावती मालक नामे-२) मोहम्मद जावीद अब्दुल खालिक वय ३० वर्ष, रा. रजा मस्जीद अन्सारी नगर अमरावती याचे विरुद्ध पोस्टे मौदा येथे कलम ३७९, १०९, ३४ भा. द. वी. सहकलम ४८ (७), ४८(८) महा. ज. म. स. सहकलम ४, २१ खाणी आणि खनिजे अधी. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. मौदा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कामठी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मौदा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत, पाहवा राजेंद्र गौतम, पोशि अतुल निंबार्ते, शुभम ईश्वरकर यांनी केलेली आहे.