नागपूर :- पोलीस ठाणे गिट्टीखदान हहीत, हजारी पहाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया मागे, नागपुर येथे राहणाऱ्या फिर्यादी श्वेता चंद्रमणी देशभ्रतार, वय २७ वर्षे, यांनी त्यांची अॅक्टीव्हा गाडी क. एम.ए ३१ एफ.डी ११५३५ किंमती ५०,०००/- रू ची पोलीस मुख्यालय येथील शिवाजी मैदान येथे लॉक करून पार्क केली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची अॅक्टीव्हा गाडी चोरून नेली. फिर्यादी यानी अशा दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा. दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. २ ये अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, एक संशयीत ईसम पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत वाहनासह ऊभा आहे अशा माहितीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीतुन नमुद ईमास ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्याने त्याने नाव रोहीत रामसखा बलराम पांडे वय ३२ वर्ष रा. गाव मेढय, ता. लालगंज, जि. मिर्जापूर, उत्तर प्रदेश, ह.मु मानस चौक ते गणेश टेकडी मंदीराचे बाजुला, नागपूर असे सांगीतले, त्यास त्याचे जवळ असलेली अॅक्टीव्हा गाडी क. एम.ए ३१ एफ.डी १५३५ बाबत विचारपूस केली असता त्याने नमुद वाहन पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीतुन चोरी केल्याचे सांगीतले, तसेच त्यास अधिक सखोल विचारपूस केली असता, त्याने पोलीस ठाणे गणेशपेठ येथुन १, पोलीस ठाणे सदर येचुन २, नागपूर ग्रामीण येथील पोलीस ठाणे बोरी हद्दीतुन २ वाहन चोरी केल्याचे तसेच पोलीस ठाणे नंदनवन हहीत घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन एकुण ०६ दुचाकी वाहन व एक ४२ इंच कलर एल.सी.डी. असा एकुण किंमती अंदाजे ३,७०,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्याात आलेला आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील तपासकामी गिट्टीखदान पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी मा. पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली, मपोनि, शुभांगी देशमुख, सपोनि. गजानन चांभारे, पोउपनि, मनोज राऊत, पोहवा, नरेश तुमडाम, संदीप चंगोले, दिनेश डवरे, नापोअं. कमलेश गणेर, प्रविण शेळके, पोअं, आशिष धंदरे, सुरेश तेलेवार, सुनिल कुवर, मंगल जाधव व प्रविण चव्हाण यांनी केली.