नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीतील मेहंदीबाग अंडरब्रिज, डॉक्टर युसूफचे दवाखान्याजवळ, यशोधरानगर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी अक्रम खान मोहम्मद खान, वय ४० वर्षे हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन, परिवारासह त्यांचे सासरी जालना येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराचे कडी-कोडा व कुलूप तोडून, घरात प्रवेश करून बेडरूम मधील लाकडी आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी २,००,०००/- रू. असा एकुण किंमती अंदाजे २,४६,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी खात्रीशीर गुप्त माहीतीवरून व तांत्रीक तपास करून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले त्यास सखोल विचारपूस केली असता त्याने त्याचा साथिदार पाहिजे आरोपी नामे यश उर्फ धम्मदीप गोपाल उईके वय २३ वर्ष रा. संजयगांधी नगर, गोंड मोहल्ला, इंदिरामात्ता नगर, यशोधरानगर, नागपूर याचेसह वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली.
दिनांक ०४,०७.२०२४ मे २३.५५ वा. ते दि. ०५.०७.२०२४ चे ०७.०० वा. चे दरम्यान, पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत बारासिग्नल, बोरकर नगर, आरा मशिनचे बाजुला, ईमामवाडा, नागपुर येथे राहणारे फिर्यादी निशांत संजय खरे, वय २३ वर्षे, यांनी त्यांची होन्डा शाईन गाडी क. एम.एच ३१ एफ.एल ४२०२ किंमती २०,०००/- ची घरा समोर लॉक करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे ईमामवाडा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या. संहीता अन्वये गुन्हा दाखल होता.
गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांनी खात्रीशीर गुप्त माहीतीवरून व तांत्रीक तपास करून, एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले त्यास सखोल विचारपूस केली असता त्याने वर नमुद वाहन चोरीची कबुली दिली. नमुद तपासादरम्यान पोलीसांना सुचना मिळाली की, पोलीस ठाणे कन्हान व इतर ठिकाणी चोरी करणारे आरोपी हे मोमीनपुरा, नागपूर येथे आहे. अशा माहितीवरून सापळा रचुन आरोपी १) विक्की उर्फ बिट्टू योगेश डेहेरीया वय २२ वर्ष रा. झाडे चौक, शांतीनगर, नागपूर २) पियुव उर्फ गट्टू दिपक निमजे वय १९ वर्ष रा. धम्मदिप नगर, नागोबा मंदीर जवळ, यशोधरानगर, नागपूर व एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले त्यांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस ठाणे कन्हान हद्दीत हिमांशू मोबाईल शॉपी, साई पान पॅलेस, अमन पान पॅलेस व धानवी पान पॅलेस येथे चोरी केल्याची कबुली दिली. तसेच आरोपींनी पोलीस ठाणे सावनेर येथील राज कमल चौक येथे चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पोलीस ठाणे उमरेड हद्दीत त्याचे एक इतर साथिदार पाहिजे आरोपी सोबत जगनाडे शाळे जवळ, इतवारीपेठ व कोठारी ले-आउट, उमरेड येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
वरील आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन दोन दुचाकी, मोबाईल फोन व रोख असा एकूण ३,६६,२५०/- रू या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी पोलीस आयुक्त नागपूर शहर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उपआयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. मुकुंद ठाकरे, पोउपनि, मधुकर काठोके, सफौ. सतिश पांडे, दशरथ मिश्रा, पोहवा. विजय ओवास, संतोषसिंह ठाकुर, पोअं. जितेश रेडी, दिपक दासरवार, दिपक लाखडे, विशाल रोकडे व प्रमोद देशभ्रतार यांनी केली.