नागपूर :- फिर्यादी सुधीर शत्रुघ्न निपोडे वय ३२ वर्ष रा. लॉट नं. ८०, महेश नगर, स्वामीनारायण मंदीर जवळ, वाठोडा, नागपूर हे त्यांचे मोटरसायकल क. एम. एच. ३१ बी.सी ९०२६ ने ईतवारी, मस्कासाथ येथुन गरी परत येत असता, संघर्षनगर चौकात त्यांना दोन २० ते २५ वर्ष वयाचे मुले अंधारात एका २० वर्षाच्या मुली सोवत बोलतांना दिसल्याने फिर्यादी यांनी त्या मुलांना हटकले त्यावरून ती मुले तेथुन निघुन गेले, मुलीने फिर्यादी यांना तरोडी टी पॉईन्ट जवळ सोडुन देण्याची विनंती केल्याने फिर्यादीने मुलीला तरोडी टि पॉईन्ट जवळ सोडून देत असता तेथे ती दोन मुले काळया रंगाचे मोपेड गाडीने फिर्यादीच्या गाडीला आडवे झाले व फिर्यादीस हातबुक्कीने मारहाण करून फिर्यादीने खिश्यातुन १५,०००/- रू व व्हीवो कंपनीचा मोबाईल असा एकुण २५,०००/- रू. चा मुद्देमाल जबरीने हिसकावुन बिडगावचे दिशेने पळून गेले. फिर्यादी यांनी पोलीस ठाणेला येवून दिलेल्या तकारीवरून पोउपनि, विनोद वांदे यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०९ (६), ३(५) भा.न्या.सं., अन्वये गुन्हा दाखल करून तपास पथकासह आरोपींचा शोध घेवुन आरोपी क. १) कुणाल भैयालाल वानखेडे वय २० वर्ष २) अक्षय महेश कुंभलकर वय २२ वर्ष दोन्ही रा. सुरज नगर, डम्पींग यार्ड जवळ, वाठोडा, नागपूर ताब्यात घेवुन विचारपूस केली असता आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली, आरोपींचे ताब्यातुन फिर्यादीचा चोरी केलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अटक करून मा. न्यायालयातुन आरोपींची पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे
जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना १२ तासाचे आत अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com