नागपूर :- फिर्यादी रविन्द्र श्यामराव वानखेडे वय ४२ वर्ष रा. प्लॉट नं. १७, भोलेबाबा नगर, उदय नगर, रिंग रोड, हुडकेश्वर, नागपूर हे त्यांचे मित्र नामे प्रज्वल शंभरकर वय १८ वर्ष रा. दिघोरी, नागपूर यांचेसह ए.सी दुरुस्तीचे काम करतात, व होम व्हीझीट देतात. दिनांक १५.१०.२०२४ से १४.३० वा. चे सुमारास पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत स्टेट बैंक ऑफ इंडिया, शाखा महाल ने समोर सार्वजनीक रोडवर, फिर्यादी व त्यांचा मित्र हे ऊभे असता फिर्यादी बँकेत पासबुक प्रिंट करण्याकरीता गेले. त्यादरम्यान एका बुलेट गाडीवर दोन २५ ते ३० वर्ष वयाचे अनोळखी ईसमांनी येवुन फिर्यादीचे मित्रास ५,०००/- रू. ची मागणी केली. फिर्यादीचे मित्राने नकार दिला असता, त्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीचे मित्रास हातबुक्कीने मारहाण करून त्यांचे जवळ असलेली ए.सी दुरूस्ती किट असलेली बॅग किंमती १५,०००/- रू. यो जबरीने हिसकावून पळुन गेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गणेशपेठ येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०९ (४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे समांतर तपासात गुन्हेशाखा युनिट क. ३ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपासावरून आरोपी नामे १) समर्थ प्रराग भोसले, वय २३ वर्षे, २) संकेत नितीन कत्तले वय २३ वर्ष दोन्ही रा. नाईक रोड, महाल, कोतवाली, नागपूर यांना रेशीमबाग मैदान येथून ताब्यात घेवुन विचारपूस केली असता, त्यांनी संगणमत करून वर नमुद गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीचे ताब्यातुन ए.सी किट असलेली बॅग व गुन्हयात वापरलेले बुलेट वाहन असा एकुण किंमती अंदाजे १,६५,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना मुद्देमालसह पुढील कारवाई करीता गणेशपेठ पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि. मुकुंद ठाकरे, पोउपनि, एन.आर देवकाते, सफौ. ईश्वर कोरडे, मिलींद चौधरी, पोहवा. अनुप तायवाडे, अमोल जासूद, विनोद गायकवाड व नापोअं. संतोष चौधरी यांनी केली.