नागपूर :-दिनांक १०.०८.२०२३ ला पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत राहणारे १८ वर्गीय फिर्यादी यांचे २० वर्षीय मावस बहिनीची आरोपी सुमेध भुजबळ बारसागडे वय २० वर्ष रा. बल्लारशाह जि. चंद्रपूर यांचे सोबत इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. व त्यांचे आपसात बोलचाल सुरू होती. काही करणास्तव आरोपी सोबत फिर्यादीचे मावस बहिनीने बोलने बंद केले होते. याकारणावरून आरोपीने फिर्यादीच्या मित्रामार्फत फिर्यादीला भेटायचे आहे अशी माहिती देवून फिर्यादीस पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीत बजाजनगर चौक ते अभ्यंकर नगर चौक दरम्यान चहाचे दुकानावर बोलावुन फिर्यादी सोबत आरोपीचे मावस बहिनी सोबत झालेले वादावरून भांडण करून फिर्यादीस अश्लिल शिवीगाळ करून फायटर व चाकुने मारहाण करून जखमी केले, जखमीचा उपचार मेयो हॉस्पीटल येथे करण्यात आला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे बजाजनगर येथे पोउपनि पारखी यांनी आरोपविरुद्ध कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, भा.दं.वी सहकलम ४/२५ भा.इ.का. सहकलम १३५ म.पो. का अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.