नागपूर :- फिर्यादी नामे राजेश बाबुलाल लांजेवार वय ४० वर्ष रा. मांडवा वस्ती, उपलवाडी, कपिलनगर, नागपुर है बांधकाम मिखी असुन भिलगाव येथे दिवसभर मिस्त्री काम करून ते व त्यांचे सोबत ठेकेदार नामे संजय घनश्याम पराशर वय ४२ वर्ष रा, मांडवा वस्ती, कामठी रोड, नागपूर असे दोघे पायदळ घरी जात होते. नाका नं. २. खसाळा फाटा येथे रोड क्रॉस करीत असतांना त्यांचे मागुन येणाऱ्या या ४०७ ट्रक क्र. एम.एच ४९ ए.टी ९२०० चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे दारूचे नशेत चालवून, दोघांनाही धडक दिल्याने फिर्यादी हे फेकल्या गेले व संजय याचे डोक्याला व तोडांला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी यांना लोकांनी उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी संजय पराशर यांना तपासुन मृत घोषीत केले, फिर्यादी यांचा उपचार सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कपिलनगर सपोनि, शिंदे यांनी आरोपी वाहन बालक नामे लिलाबर सोनीराम पुराम वय ३१ वर्ष रा. मिरेगाव, ता. लाखनी, जि. भंडारा याचे विरूध्द कलम १०५ भा.न्या.सं. सहकलम १८४, १८५ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.