जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी ताब्यात

नागपूर :- दिनांक २०,०७,२०२३ च्या १५.३० वा. चे सुमारास फिर्यादी खुशी सरोजकुमार मेश्राम वय १९ वर्ष रा. नं. २५७ सुगतनगर पोलीस चौकी मागे नागपुर या त्यांचे मित्रासह त्यांच्या दुचाकी गाडीने नारा गावाकडे गाडी देण्यासाठी जात असतांना नाराघाटचे रोडवर फिर्यादीची मैत्रीण शिल्पा २० वर्ष रा. गट्टीखदान नागपूर व तिचे सोबत तिचा मित्र सुयोग परसराम उके वय २३ वर्ष रा. इंदोरा, जेतवन बौध्दविहारा जवळ, नागपूर हे दुचाकीने जात असतांना फिर्यादींला दिसले तेव्हा त्यांनी दोघांचेही वाहने थांबवून रोडने बाजुला बोलत उभे असतांना आरोपी मंगल सुरजितसिंग गुलेरीया वय २० वर्ष मानव नगर, टेकनाका, पंचभाई यांचे घरी किरायाने, कपिलनगर हा मागुन ॲक्टिवा गाडीने येवुन फिर्यादी जवळ गाडी थांबवुन फिर्यादीचे मित्रास तुला गाडी चालवता येत नाही का असे म्हणुन अश्लिल शिवीगाळ केली. व फिर्यादीचा मित्र रौनक याला हातबुक्कीने मारपिट करू लागला फिर्यादीचा मित्र सुयोग उके हा भांडण सोडविण्यास गेला असता त्याला सुध्दा शिवीगाळ करून धक्का देवुन आरोपीने कमरेतून चाकू काढून सुयोग यास जिवानिशी ठार मारण्याचे उद्देश्याने त्याचे पोटावर चाकु मारू लागला सुयोगने त्याचा हात पकडला असता त्याने पुन्हा चाकु मारण्यास सुरूवात केली. या मध्ये सुयोग उके याचे पोटावर गंभीर दुखापत झाली. जख्मी यास उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे दाखल केले असुन उपचार सुरू आहे.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे जरीपटका येथे पोउपनि बाव्यसाहेब टेकाळे यांनी आरोपीविरुद्ध कलम ३०७, २९४, ५०६ (२) भादवि अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

Fri Jul 21 , 2023
नागपूर :- पोलीस ठाणे सक्करदरा हदीत सक्करदरा चौक ते  सक्करदरा बस स्टॉप दरम्यान पोलीस ठाणे कुही हददीत राहणारी १७ वर्षीय फिर्यादी पिडीता ही तिचे मैत्रीणी सोबत पायदळ कॉलेज मध्ये जात असता आरोपी सोनू उर्फ गैंडा राजकुमार दांडेकर, वय २४ वर्षे, रा. भाई प्लॉट, रविदास मंदीर समोर, नागपूर याने पाठलाग करून पिडीतेला तु सुंदर दिसत आहे. तुझा मोबाईल नंबर दे ” […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!