– स्थानिक गुन्हे शाखा यांची कारवाई
खापरखेडा :-दि. ०९/१०/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की पोलीस स्टेशन खापरखेडा अंतर्गत जयभोले नगर वार्ड क्र. ०५ चनकापुर परीसरात राहणारा अजय गुणा नावाचा इसम हा स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता आपले राहते घरी आपली आई चंदा हिच्या सोबत बाहेरून स्त्रिया बोलावून त्यांना आपले घरी गीन्हाईक व जागा उपलब्ध करून अवैध वेश्या व्यवसाय चालवीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन घटनास्थळावर रेड कारवाई करून वेश्याव्यवसाय चालविणारे घर मालक फरार चंदा हनुमानप्रसाद गुप्ता, वय ६५ वर्ष, सर्व रा. चनकापुर खापरखेडा हिचा मुलगा १) अजय हनुमानप्रसाद गुप्ता, वय ४२ वर्ष हा २) राहुल तीलकचंद गुप्ता, वय २२ वर्ष व ०२ महिला यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना त्यांची मेडिकल तपासणी करून जप्त मुद्देमालासह पोलीस ठाणे खापरखेडा यांचे ताब्यात देण्यात आले असून त्यांचे विरुद्ध कलम ३, ४, ५ महिला अनैतीक व्यापार प्रतिबंधक कायदा सन १९६५ अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास पोलीस ठाणे खापरखेडा करीत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भा.पो.से) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, पोलीस उपनिरीक्षक बलाल पांडे, सहायक फौजदार नाना राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, इकबाल शेख, प्रमोद भोयर, महिला पोलीस हवालदार नीतू खोब्रागडे, कवीता वचले, पोलीस नायक विरु नरड, चालक मोनू शुक्ला यांनी पार पाडली.