वाघ शिकार प्रकरणातील आरोपींचा वन कर्मचाऱ्यांवर हल्ला

– एफआयआर दाखल

रामटेक – 12 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील पवनी बफर वन क्षेत्रात वाघाची शिकार झाल्याचा गुन्हा नोंद झाला. चार गुन्हेगारांना अटक करण्यात आली आणि त्यांना JMFC रामटेक कोर्टाने 17 जानेवारीपर्यंत वन कोठडीत पाठवले. कोठडीदरम्यान आरोपी विनोद चोखंद्रे याने वन कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला हाताळणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवरही हल्ला केला.

याप्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनी देवलापार पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, रामटेक यांचेसमोर हजर केले. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. तसेच एका आरोपीकडून मृत वाघाच्या शरीराचे आणखी काही काढलेले अवयव जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय गुन्ह्यात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. फरार गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.

या विद्युत तारांच्या अवैध वापरातून झालेल्या शिकार प्रकरणी आवश्यक माहिती आणि मदतीसाठी महावितरण विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे.

उद्या वन कोठडी संपत असल्याने अटक केलेल्या गुन्हेगारांना पुढील कार्यवाहीसाठी मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, रामटेक येथे हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास ए. श्रीलक्ष्मी, क्षेत्र संचालक आणि उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. वन संरक्षक अतुल देवकर आणि व. प. अ. पवनी, जयेश तायडे, हे करत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 96 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Tue Jan 17 , 2023
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवारी (16) रोजी शोध पथकाने 96 प्रकरणांची नोंद करून 56000 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com