घातकशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पाचपावली पोलास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, बारसे नगर, सरकारी शौचालय जवळ, कलकत्ता रेल्वे लाईन जवळ, एक संशयीत ईसम पोलीसांना पाहुन पळण्याचे प्रयत्नात असतांना, त्यास घेराव टाकून ताब्यात घेतले. त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव सतीष रतनलाल गौर, वय ३२ वर्षे, रा. ज्योती नगर खदान, डागा हॉस्पीटल मागे, तहसिल, नागपुर असे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याचे जवळ एक जुनी लोखंडी तलवार किंमती अंदाजे ५००/- रू. ची मिळून आल्याने ती जप्त करण्यात आली. आरोपी हा घातक शस्त्र बाळगतांना समक्ष मिळून आल्याने, त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने, त्याचे विरूध्द पोलीस ठाणे पाचपावली येथे पोहवा. सगीर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोउपनि, जाधव यांनी आरोपीविरूध्द कलम ४, २५ भा.ह.का., सहकलम १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विजयादशमी निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

Fri Oct 11 , 2024
मुंबई :- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विजयादशमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दसरा अथवा विजयादशमीचा सण अपप्रवृत्तींवर सतप्रवृत्तीच्या विजयाचे प्रतीक आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो, असा विश्वास या सणाच्या माध्यमातून मिळतो. यंदाची विजयादशमी सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. Follow us on Social Media […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com