– पोलीस स्टेशन जलालखेडाची कार्यवाही
जलालखेडा :- पोलीस स्टेशन जलालखेडा येथील स्टाफ पोलीस स्टेशन जलालखेडा हद्दीत अयोध्या बंदोबस्त निमित्त पेट्रोलिंग करीत असताना थुगाव येथे गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम अवैधरीत्या दारूची चोरटी वाहतूक करून मोवाड़ कडून थुगाव कडे येत आहे. अशा खबरे वरून भुगाव बस स्टॉप येथे नाकाबंदी केली असता एक इसम अवैद्य दारू घेऊन येतांना दिसला त्याला थांबवून त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्यांने आपले नाव सागर जगदीश वैद्य, वय २५ वर्ष, रा. मोवाड असे सांगितले, आरोपीची झडती गेतली असता त्याचे ताब्यातून मोटर सायकलवर विनापरवाना व अवैधरीत्या ९० एम. एल क्षमतेच्या देशी दारू संत्रा कोकणचे १०० निषा किंमती ३५००/- रुपये तसेच १८० एम एल क्षमतेच्या ४८ निपा किंमती ३३५० रुपये व एम. एच. ३१/ ई वी ६१२३ अॅक्टिवा गाडी किंमती ने ४०००० हजार रुपये असा एकूण ४६८६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर इसमावर कलम ६५ (इ) (अ) म.दा.का. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष ए. पोद्दार (भा.पो.से.) तसेब अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक चेतनसिंग बव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मनोज शेंडे, पोलीस नायक हिरुळकर, पोलीस अंमलदार इब्राहिम सय्यद पोलीस स्टेशन जलालखेडा यांनी केली