नागपूर :-पोलीस ठाणे ईमामवाडा हद्दीत, रामबाग, सिमा वस्त्र भंडारचे मागे राहणारे फिर्यादी सन्नी उर्फ नबी सर्जेराव राहुलकर ३६ वर्ष यांचे रामबाग येथे किराणा दुकान आहे. दिनांक ०४.०६.२०२३ ला आरोपी १) राजू उर्फ भिक्कु रामभाऊ परचाके वय ४३ वर्ष २) सुनिल उर्फ अभिजीत अजय पाहुणे वय २४ वर्ष ३) निलेश उर्फ नाना विनोद मेश्राम वय २६ वर्ष तिन्ही रा. मैत्री बुध्दविहाराजवळ, रामबाग, ईमामवाडा ४) आशिष यादव वय ३२ वर्ष रा. गणेशपेठ यांनी संगणमत करून फिर्यादीला “तेरे को अगर तेरा किराणा दुकान चलाना है तो हमे रोज के २,०००/- रू देना पड़ेगा, नहीं तो हम तेरा बस्ती में रहना मुश्कील कर देंगे, और तुझे जान से मार देंगे” असे म्हणून फिर्यादी कडुन ६,०००/- रु वसुली केले. आरोपींनी पुन्हा येवुन फिर्यादीस दिनांक ०३:०७,२०२३ चे १५.३० वा. खंडणीची मागणी करून रक्कम वसुल करण्याकरीता धमकी दिली. सुमारास याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस ठाणे ईमामवाडा येथे मपोउपनि सोमनकर यांनी आरोपविरुध्द कलम ३८६ ३८७ ३४ भाव अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी क. १ ते ३ यांचा शोध घेवून अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com