नागपूर :- कळमणा पोलीसांचे तपास पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, त्यांनी सापळा रचुन, गौरीशंकर नगर रोडवर, पिडु किराणा दुकानासमोर अॅक्टीवा क. एम.एच. ४९ बि. एस. २७६६ ला चांबवुन चालकास त्याचे नांव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव संजीव उर्फ सुजित धनराज मंडलेकर, वय ३६ वर्ष रा. प्लॉट नं. ५. एकता ले-आऊट, कळमना, नागपूर असे सांगीतले. त्याचे ताब्यातून शासनाने प्रतीबंधीत केलेला वेग-वेगळया प्रकारचा गुटखा व पानमसाले राजश्री, पानपराग, विमल, ब्लॅक लेबल इ. असा एकूण किंमती अंदाजे ३२,५७६/-रू चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीचे ताज्यातुन तंबाखुजन्य पदार्थ अॅक्टीवा व मोबाईल असा एकुण किंमती अंदाजे १.२२,५७६/-रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा स्वतः ये आर्थिक फायदयाकरीता प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थ विकी करीता जवळ बाळगुन होता आरोपीचे कृत्य हे कलम १२३, २२३, २७४, २७५ भा.न्यां.सं., सहकलम २६(२)(0), २६(२) (iv), सहवाचन कलम २७ (३) (३) ५९ अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ अन्वये होत असल्याने आरोपींविरूध्द पोलीस ठाणे कळमना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून केली आहे.
वरील कामगिरी निकेतन कदम, पोलीस उप आयुक्त (परि. क. ५), विशाल क्षिरसागर, सहा. पोलीस आयुक्त (कामठी विभाग) यांचे मार्गदर्शानाखाली वपोनि प्रविण काळे, पोनि. सतिष आळे, सपोनि. शशिकांत मुसळे, सफौ बाळा साकोरे, पोहवा विशाल अंकलवार, विशाल भैसारे, पोअं ललीत शेंडे व वसिम देसाई यांनी केली.