नागपूर :- पोलीस ठाणे नंदनवन चे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की अभिनंदन हाय स्कुलच्या मागे, शितला माता मंदीर जवळ, नागपुर येथे आरोपी नामे राकेश राधेलाल श्रीवास्तव वय ४१ वर्ष हा राहते घरी घरघुती वापराचे गॅस सिलेंडरचा साठा बाळगुन अवैधरित्या वाहनामध्ये गॅस भरत आहे. अशा माहीती वरून त्यांनी सोबत अन्न वितरण विभागाचे परिमंडळ अधिकारी दिपाली बनसोड व त्यांचे पथक यांचे सह रश्मीता राव पोलीस उप आयुक्त परि. क. ४ यांच्या मार्गदर्शनात वर नमुद आरोपीचे परी प्लॉट नं. १०१/ए, बापूनगर, अभिनंदन हायस्कुल मागे, याचे घरी रेड कारवाई केली असता, आरोपीने आपले ताब्यात ११ भारत गॅस घरघूत्ती सिलेंडर, ०३ एच.पी कंपनीचे घरघुती गॅस सिंलेडर, ०१ गॅस रिफील मशीन अवैधरित्या बाळगतांना मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यातुन नमुद मुद्देमाल व एक ओमनी असा एकुण १,३५,०००/७ रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीचे हे कृत्य कलम ३, ७ अत्यावश्यक वस्तु अधिनियम अन्वये होत असल्याने गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, शिवाजीराव राठोड अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) नागपूर शहर, रश्मीता राव, पोलीस उप आयुक्त (परि. के. ४), विनायक कोते, सहा. पोलीस आयुक्त (सक्करदरा विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, विनायक कोळी, दपोनि जयवंत पाटील, सपोनि प्रशांत सावळे, पोहवा, आशिश नापोअ, संजय पोअ. प्रदीप, सोमेश्वर, अनिकेत, मपोअं. स्वाती, दिपाली, सोनु व अन्न वितरण विभागाचे परिमंडळ अधिकारी श्रीमती दिपाली बनसोड व त्यांचे पथक यांनी केली.