नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. २ पोलीसांचे पथक हे पोलीस ठाणे सदर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून गड्डीगोदाम, कसाई मोहल्ला येथे रेड कारवाई केली असता, नमुद ठिकाणी जिवंत गोवंशीय जनावरे निर्देवतेने कोंबुन बांधुन असल्याचे दिसुन आले. नमुद ठिकाणी विचारपुस केली असता, नमुद जनावरे आरोपी १) मुदस्सीर अहमद कुरेशी, वय ३० वर्षे २) नासोर उर्फ मामु कुरेशी, ३) तनविर सलीम कुरेशी, सर्व रा. गड्डीगोदाम, कसाई मोहल्ला, सदर याचे मालकीचे असल्याचे समजले. घटनास्थळावरून एकुण २४ जिवंत गोवंशीय जनावरे किंमती अंदाजे २,४०,०००/- रू. वा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवंशीय जनावरे याची सुटका करून गोरक्षण समिती, धंतोली, वर्धा रोड, नागपुर येथे पाठविण्यात आले. याप्रकरणी पोलीस ठाणे सदर येथे आरोपीविरूध्द कलम ५(अ), ५(ब), ९. ९ (अ) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा-१९९५, सहकलम ११(ई) (फ) प्राणी करता अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीस पुढील कार्यवाहीस्तव सदर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.